Wednesday, November 26, 2008
जिल्ह्यात आणखी एक "मेगा प्रोजेक्ट'
सातारा, ता. २५ - इलेक्ट्रॉनिक पार्क, बेस्टचा बायोमास वीजनिर्मिती प्रकल्प, परी ऑटोमेशन सिटी आणि आता भूगर्भातील तेल शोधणारी यंत्रणा विकसित करणारा प्रकल्प... खंडाळा तालुक्यात सेझअंतर्गत हा आणखी एक मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. केसुर्डी येथे २५ हेक्टरवर होणाऱ्या या प्रकल्पासाठी दोन कंपन्या ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून सुमारे ८०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्क्लंबर इंडिया टेक टॉनटन प्रायव्हेट लिमिटेड आणि वेस्टर्न जेको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या प्रत्येकी अडीचशे कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात करणार आहेत. भूगर्भातील तेल शोधणाऱ्या यंत्रणेचे त्यात उत्पादन होणार आहे. समुद्रात व जमिनीवरून भूगर्भातील तेल शोधणारी यंत्रणा, त्यासाठी लागणारी केबल, सेन्सॉर आदींची निर्मिती येथे होणार आहे. याबाबतच्या प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व एमटीडीसी यांच्याकडून मंजूर झाले आहेत. सध्या या प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून, येत्या वर्षभरात तो पूर्ण होईल. आतापर्यंत खंडाळा तालुक्यातील शिरवळ व केसुर्डी येथे इलेक्ट्रॉनिक्स पार्क, ऑटोमेशन सिटी, तसेच बेस्टचा बायोमासपासून वीजनिर्मिती हे प्रकल्प आलेले आहेत. यामध्ये भूगर्भातील तेल शोधणारी यंत्रणा बनविणाऱ्या या प्रकल्पाची भर पडली आहे. सेझअंतर्गत येणाऱ्या या "मेगा प्रोजेक्ट'मुळे खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यातून काही उद्योग बाहेर गेल्याने औद्योगिक वसाहतीतील वातावरण दूषित झाले होते. मात्र, आता वातावरण पुन्हा बदलण्यास सुरवात झाली असून, जिल्ह्यातील स्थानिक लघुउद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सेझअंतर्गत मोठी गुंतवणूक केसुर्डी येथे एकूण ३३० हेक्टरवर सेझ विकसित होत आहे. १५ मोठे प्रोजेक्ट येणार आहेत. यामध्ये परी ऑटोमेशन सिटीचा समावेश असून, त्यात २५८ कोटींची गुंतवणूक होणार आहे. १२०० जणांना रोजगार मिळणार आहे. शिरवळ येथील इलेक्ट्रॉनिक पार्कमध्ये ५० कोटींची गुंतवणूक होणार असून, ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय केंद्राने जिल्ह्यात मेगा फूड पार्कला मंजुरी दिली आहे. लोणंद येथील बायोमास वीजनिर्मिती प्रकल्पात ९० कोटींची गुंतवणूक होणार आहे.
Labels:
Industrial,
mega project,
MIDC,
Phaltan,
satara,
मेगा प्रोजेक्ट
Monday, November 24, 2008
राम- सीतेच्या मूर्तींची फलटणला मिरवणूक
फलटण, ता. २४ - वाद्यांच्या गजरात काल रात्री चांदीच्या प्रभावळीतून निघालेल्या राम- सीतेच्या मूर्तींच्या मिरवणुकीने श्रीराम रथोत्सवाला शहरात सुरवात झाली. वाहने पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
ता. २८ रोजी रामरथयात्रेचा प्रमुख दिवस आहे. तत्पूर्वी पाच दिवस राम- सीतेच्या मूर्तींची वाजत गाजत मंदिर परिसरात मिरवणूक काढण्याची धार्मिक परंपरा असल्याने काल पहिल्या दिवशी राम- सीतेच्या मूर्तींची मिरवणूक विद्युत रोषणाईने सजविलेल्या प्रभावळीतून काढण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता राममंदिराच्या गाभाऱ्यामधून निघालेले प्रभावळीचे वाहन वाजतगाजत मंदिराबाहेर आल्यानंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालून रात्री साडेदहा वाजता राममंदिरात पुन्हा परतले.
राम रथोत्सवानिमित्त गेली २५० वर्षे वाहने काढण्याची प्रथा जपली गेली असून, त्याचे वेगळेपण अद्यापही टिकून आहे. उद्या (मंगळवारी) शेषनाग वाहनातून मूर्तींची मिरवणूक काढली जाणार आहे.

Wednesday, October 22, 2008
फलटणमध्ये भर बाजारपेठेत तलवारीने वार करुन एकाची हत्या
फलटण- शहरातील बाजारपेठेत बुधवारी (ता. २२) सकाळी ११ च्या सुमारास सुरेश पवार (वय ४९) या खजूर विक्रेत्याचा तलवारीने वार करून खून झाल्याने खळबळ माजली.
या घटनेनंतर शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना शहरातील शिवाजी पुतळ्याजवळील हॉटेल अतिथीसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. पवार यांच्या पुतण्यावरही तलवारीने वार करण्यात आले. या हल्ल्यात तोही गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेचे कारण अजून समजू शकले नाही.

Sunday, October 19, 2008
"न्यू फलटण'चा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा - पृथ्वीराज चव्हाण
साखरवाडी, ता. १९ - न्यू फलटण शुगर वर्क्स कामगार, शेतकऱ्यांच्या मदतीने गाळपास सज्ज झाला असून, हा आदर्श इतर कारखान्यांनी स्वीकारावा, असे आवाहन पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील न्यू फलटण शुगर वर्क्सच्या ७६ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिंदूराव नाईक - निंबाळकर होते. या वेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, उद्योगपती माधवराव आपटे, विक्रम आपटे, महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी परिषद मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश धायगुडे, विजयसिंह भोसले, धोंडिराम वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ""लहान कारखान्यांना मोठ्या कारखान्यांशी स्पर्धा करणे अवघड आहे. जुन्या छोट्या कारखान्यांना महाराष्ट्र शासनाने विशेष सवलती दिल्या पाहिजेत. "न्यू फलटण'ने शेतकरी, कामगार एकत्र येऊन एखादी संस्था चालवू शकतात याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.''
प्रल्हादराव साळुंखे- पाटील म्हणाले, ""क्षमतेने लहान, जुनी मशिनरी असलेला कारखाना शासन व बॅंकेच्या कोणत्याही मदतीशिवाय कामगार, शेतकरी व्यवस्थापकांच्या मदतीने चालवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. येत्या गळीत हंगामातही तो यशस्वी चालवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यात निश्चित यश मिळेल. नीरा खोऱ्यातील इतर मोठ्या कारखान्यांप्रमाणे किंवा शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे पहिला हप्ता देण्याची तयारी आहे.'' कारखान्याला अबकारी करातून राज्य सरकारकडून सवलत मिळावी, अशी मागणी या वेळी त्यांनी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली.
या वेळी अध्यक्ष हंबीरराव भोसले, संचालक श्यामराव भोसले, बाबूराव काकडे, राजेंद्र शेलार, लोणंदच्या सरपंच सौ. डोईफोडे, कारखान्यातील अधिकारी, कामगार, शेतकरी आदी उपस्थित होते.

Monday, September 22, 2008
Wednesday, July 30, 2008
पावसानेही दिला "धक्का'!
सातारा, ता। ३० - जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्री झालेल्या भूकंपानंतर पावसानेही उघडीप देऊन जिल्ह्यातील जनतेला "हादरा' दिला आहे। पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर मंदावला असून, पूर्वेकडील तालुके अद्यापही कोरडेच आहेत।
शहर परिसरात आज दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती। दरम्यान, फलटण तालुक्यातील ६८, तर खंडाळा तालुक्यातील पाच गावे पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असल्याने टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत। महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण होते. गेली दोन- चार दिवस पावसाने चांगलाच जोर धरला होता. पश्चिमेकडील भागात विक्रमी स्वरूपाचा पाऊस झाला. मुख्य धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खरीप पिकांनाही जीवदान मिळाले. पावसाविना कुचंबलेल्या पिकांना पुन्हा उभारी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चार रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पावसाने दडी मारली आहे. पश्चिमेकडील तालुक्यातील पावसाचा जोर मंदावला आहे. शहर परिसरात आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली. अधूनमधून सूर्यदर्शनही होत होते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील खटाव, माण, फलटण व खंडाळा हे तालुके अद्याप कोरडेच आहेत. फलटण तालुक्यातील ६८, तर खंडाळा तालुक्यातील पाच गावे पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असल्याने टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली आहे. सकाळी आठ वाजता नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः महाबळेश्वर- ७७.६, नवजा- ६०, कोयनानगर- १०६, पाटण- २१, कऱ्हाड- ३.४, जावळी- २२, वाई- तीन, सातारा- १५, कोरेगाव- २.९, खंडाळा- दोन, माण, खटाव, फलटण- पाऊस नोंद नाही.
----------------------------------------
धरणांतील पाणीसाठा (टीएमसीत) (कंसात भरल्याची टक्केवारी)
कोयना- ५८।२ (५५)
धोम- ६।२० (३८)
कण्हेर- ३।७० (३३।९९)
उरमोडी- १।६० (१३)
धोम- बलकवडी १।८० (४२)

Thursday, July 3, 2008
ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आज जील्ह्यात आगमन
ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आज जील्ह्यात आगमन
ता. २ - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या दुपारी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात आगमन होत आहे.पालखी सोहळ्याचा लोणंद येथे अडीच दिवसांचा मुक्काम आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, लोणंदनगरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पूर्णपणे सजली आहे.पंढरपूरकडे निघालेला पालखी सोहळा उद्या नीरा येथे दुपारचा विसावा घेतल्यावर व माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत गंगास्नान घातल्यावर दुपारी तीन वाजता पाडेगाव येथे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वागतासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मदन भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव कडू-पाटील आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.पाडेगाव येथे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीला पुष्पहार घालून सजविण्यात आले आहे.लोणंदचा उद्या आठवड्याचा बाजार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्याचा बाजार गोठेमाळ येथे भरणार आहे.---------------------------------------------------------संपर्कासाठी दूरध्वनीलोणंद ग्रामपंचायत- ०२१६९-२२५२५०उपसरपंच राहुल घाडगे- ९४२२०३९९६८लोणंद पोलिस ठाणे- ०२१६९-२२५०३३सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे- ९४२१२०९५४५लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र- २२५३७३डॉ. एस. वाय. सरोदे- ९८९००९२३४४---------------------------------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)