Thursday, July 3, 2008

ज्ञानेश्‍वरांच्या पालखीचे आज जील्ह्यात आगमन

ज्ञानेश्‍वरांच्या पालखीचे आज जील्ह्यात आगमन

ता. २ - श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या दुपारी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात आगमन होत आहे.पालखी सोहळ्याचा लोणंद येथे अडीच दिवसांचा मुक्काम आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, लोणंदनगरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पूर्णपणे सजली आहे.पंढरपूरकडे निघालेला पालखी सोहळा उद्या नीरा येथे दुपारचा विसावा घेतल्यावर व माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत गंगास्नान घातल्यावर दुपारी तीन वाजता पाडेगाव येथे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वागतासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मदन भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव कडू-पाटील आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.पाडेगाव येथे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीला पुष्पहार घालून सजविण्यात आले आहे.लोणंदचा उद्या आठवड्याचा बाजार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्याचा बाजार गोठेमाळ येथे भरणार आहे.---------------------------------------------------------संपर्कासाठी दूरध्वनीलोणंद ग्रामपंचायत- ०२१६९-२२५२५०उपसरपंच राहुल घाडगे- ९४२२०३९९६८लोणंद पोलिस ठाणे- ०२१६९-२२५०३३सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे- ९४२१२०९५४५लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र- २२५३७३डॉ. एस. वाय. सरोदे- ९८९००९२३४४---------------------------------------------------------


No comments: