फलटण, ता. २४ - वाद्यांच्या गजरात काल रात्री चांदीच्या प्रभावळीतून निघालेल्या राम- सीतेच्या मूर्तींच्या मिरवणुकीने श्रीराम रथोत्सवाला शहरात सुरवात झाली. वाहने पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
ता. २८ रोजी रामरथयात्रेचा प्रमुख दिवस आहे. तत्पूर्वी पाच दिवस राम- सीतेच्या मूर्तींची वाजत गाजत मंदिर परिसरात मिरवणूक काढण्याची धार्मिक परंपरा असल्याने काल पहिल्या दिवशी राम- सीतेच्या मूर्तींची मिरवणूक विद्युत रोषणाईने सजविलेल्या प्रभावळीतून काढण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता राममंदिराच्या गाभाऱ्यामधून निघालेले प्रभावळीचे वाहन वाजतगाजत मंदिराबाहेर आल्यानंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालून रात्री साडेदहा वाजता राममंदिरात पुन्हा परतले.
राम रथोत्सवानिमित्त गेली २५० वर्षे वाहने काढण्याची प्रथा जपली गेली असून, त्याचे वेगळेपण अद्यापही टिकून आहे. उद्या (मंगळवारी) शेषनाग वाहनातून मूर्तींची मिरवणूक काढली जाणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment