Wednesday, July 30, 2008

पावसानेही दिला "धक्का'!

सातारा, ता। ३० - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रात्री झालेल्या भूकंपानंतर पावसानेही उघडीप देऊन जिल्ह्यातील जनतेला "हादरा' दिला आहे। पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत पावसाचा जोर मंदावला असून, पूर्वेकडील तालुके अद्यापही कोरडेच आहेत।

शहर परिसरात आज दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती। दरम्यान, फलटण तालुक्‍यातील ६८, तर खंडाळा तालुक्‍यातील पाच गावे पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असल्याने टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत। महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण होते. गेली दोन- चार दिवस पावसाने चांगलाच जोर धरला होता. पश्‍चिमेकडील भागात विक्रमी स्वरूपाचा पाऊस झाला. मुख्य धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खरीप पिकांनाही जीवदान मिळाले. पावसाविना कुचंबलेल्या पिकांना पुन्हा उभारी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चार रिश्‍टर स्केलच्या भूकंपानंतर पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिमेकडील तालुक्‍यातील पावसाचा जोर मंदावला आहे. शहर परिसरात आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली. अधूनमधून सूर्यदर्शनही होत होते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील खटाव, माण, फलटण व खंडाळा हे तालुके अद्याप कोरडेच आहेत. फलटण तालुक्‍यातील ६८, तर खंडाळा तालुक्‍यातील पाच गावे पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असल्याने टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली आहे. सकाळी आठ वाजता नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः महाबळेश्‍वर- ७७.६, नवजा- ६०, कोयनानगर- १०६, पाटण- २१, कऱ्हाड- ३.४, जावळी- २२, वाई- तीन, सातारा- १५, कोरेगाव- २.९, खंडाळा- दोन, माण, खटाव, फलटण- पाऊस नोंद नाही.

----------------------------------------
धरणांतील पाणीसाठा (टीएमसीत) (कंसात भरल्याची टक्केवारी)
कोयना- ५८।२ (५५)
धोम- ६।२० (३८)
कण्हेर- ३।७० (३३।९९)
उरमोडी- १।६० (१३)
धोम- बलकवडी १।८० (४२)
----------------------------------------

No comments: