सातारा, ता। ३० - जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्री झालेल्या भूकंपानंतर पावसानेही उघडीप देऊन जिल्ह्यातील जनतेला "हादरा' दिला आहे। पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर मंदावला असून, पूर्वेकडील तालुके अद्यापही कोरडेच आहेत।
शहर परिसरात आज दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती। दरम्यान, फलटण तालुक्यातील ६८, तर खंडाळा तालुक्यातील पाच गावे पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असल्याने टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत। महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण होते. गेली दोन- चार दिवस पावसाने चांगलाच जोर धरला होता. पश्चिमेकडील भागात विक्रमी स्वरूपाचा पाऊस झाला. मुख्य धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खरीप पिकांनाही जीवदान मिळाले. पावसाविना कुचंबलेल्या पिकांना पुन्हा उभारी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चार रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पावसाने दडी मारली आहे. पश्चिमेकडील तालुक्यातील पावसाचा जोर मंदावला आहे. शहर परिसरात आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली. अधूनमधून सूर्यदर्शनही होत होते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील खटाव, माण, फलटण व खंडाळा हे तालुके अद्याप कोरडेच आहेत. फलटण तालुक्यातील ६८, तर खंडाळा तालुक्यातील पाच गावे पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असल्याने टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली आहे. सकाळी आठ वाजता नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः महाबळेश्वर- ७७.६, नवजा- ६०, कोयनानगर- १०६, पाटण- २१, कऱ्हाड- ३.४, जावळी- २२, वाई- तीन, सातारा- १५, कोरेगाव- २.९, खंडाळा- दोन, माण, खटाव, फलटण- पाऊस नोंद नाही.
----------------------------------------
धरणांतील पाणीसाठा (टीएमसीत) (कंसात भरल्याची टक्केवारी)
कोयना- ५८।२ (५५)
धोम- ६।२० (३८)
कण्हेर- ३।७० (३३।९९)
उरमोडी- १।६० (१३)
धोम- बलकवडी १।८० (४२)
----------------------------------------
Wednesday, July 30, 2008
Thursday, July 3, 2008
ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आज जील्ह्यात आगमन
ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आज जील्ह्यात आगमन
ता. २ - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या दुपारी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात आगमन होत आहे.पालखी सोहळ्याचा लोणंद येथे अडीच दिवसांचा मुक्काम आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, लोणंदनगरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पूर्णपणे सजली आहे.पंढरपूरकडे निघालेला पालखी सोहळा उद्या नीरा येथे दुपारचा विसावा घेतल्यावर व माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत गंगास्नान घातल्यावर दुपारी तीन वाजता पाडेगाव येथे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वागतासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मदन भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव कडू-पाटील आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.पाडेगाव येथे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीला पुष्पहार घालून सजविण्यात आले आहे.लोणंदचा उद्या आठवड्याचा बाजार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्याचा बाजार गोठेमाळ येथे भरणार आहे.---------------------------------------------------------संपर्कासाठी दूरध्वनीलोणंद ग्रामपंचायत- ०२१६९-२२५२५०उपसरपंच राहुल घाडगे- ९४२२०३९९६८लोणंद पोलिस ठाणे- ०२१६९-२२५०३३सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे- ९४२१२०९५४५लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र- २२५३७३डॉ. एस. वाय. सरोदे- ९८९००९२३४४---------------------------------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)