Monday, May 26, 2008

रुग्णांना संजिवनी देणारे - निकोप हॉस्पिटल


Friday, May 9, 2008

राजे गटाला सर्व जागा (फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक)

राजे गटाला सर्व जागाफलटण, ता. ९ - फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व जागा पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाने मताधिक्‍याने जिंकल्या आहेत. .....चिमणराव कदम यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. रामराजे आणि संजीवराजे यांच्या वर्चस्वामुळे विरोधकांना एकही जागा मिळू शकली नाही. बाजार समितीच्या १९ जागांपैकी व्यापारी मतदारसंघातून राजकुमार सूर्यकांत मेहता आणि शशिकांत मोतीलाल दोशी हे दोन्हीही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर पणन मतदारसंघातून सुभाषराव धुमाळ यांची निवड बिनविरोध झाली आहे. हे तीनही उमेदवार राजे गटाचेच आहेत. उर्वरित १६ जागांसाठी काल निवडणूक झाली. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली. दुपारपर्यंत सर्व जागांचे निकाल घोषित झाले. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ः सहकारी संस्था मतदारसंघ - तानाजी धुमाळ (१००१), रघुनाथराजे नाईक निंबाळकर (१०५६), शिवरूपराजे खर्डेकर (१०४७), विनायकराव पाटील (१०३५), शिवाजीराव यादव (१०२२), संतोष शिंदे (१०३६), सिराज शेख (१०३१) इतर मागास वर्ग- तुळशीराम शिंदे (१०८२) अनुसूचित जाती जमाती- नंदकुमार सोनवलकर (१०७२) महिला राखीव- कमल लंगुटे (१०७२), लता सूळ (१००८) ग्रामपंचायत मतदारसंघ- मोहन निंबाळकर (६८७), धनंजय साळुंखे (६४५) अनुसूचित जाती जमाती- राजेंद्र काकडे (७२८) आर्थिक दुर्बल- विजय मदने (७२९) आणि हमाल व मापाडी मतदारसंघातून- बापू हरी करे ६१ मते मिळवून विजयी झाले आहेत. .............. सहकारावरील पगडा पक्का श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीनंतर लगेचच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने विरोधकांनी चांगलीच उचल खाल्ली होती. कारखान्याच्या निवडणुकीत चिमणराव कदम यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांना झालेल्या मतदानाच्या ४० टक्‍के मते पडल्यामुळे या वेळी विरोधकांचा उत्साह बऱ्यापैकी होता; पण त्यांची डाळ शिजली नाही. राजे गटाचा सहकार क्षेत्रावरील पगडा पक्‍का असल्याचे या निकालावरून मानण्यात येते.

Link to Original document - http://www.esakal.com/esakal/05102008/Satara752CEAB58B.htm